Shri Dnyaneshwari Chitrapath
ज्ञानेश्वरी चित्रपाठ
ज्ञानेश्वरीच्या सारयुक्त ओव्यांच्या नित्यपाठावर आधारीत एक सुंदर चित्रपाठ प्रकाशीत झाला आहे.
या पुस्तकाच्या विक्रीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची शिकवण सोप्या, सुलभ भाषेत, भरपूर चित्रांच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचावी हा मानस.
“मी कधी , कुठे व कसं वागवयच ?”
“काय चांगलं , काय वाईट, आणि का?”
हे प्रश्न लहानांना व मोठ्यांनाही पडत असतात
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या श्री ज्ञानेश्वरीतील साररूप ओव्यांचा संग्रह म्हणजेच नित्यपाठ आणि त्याचच हा चित्ररूप अविष्कार श्री ज्ञानेश्वरी चित्रपाठ
नामयोग आणि सत्संग सोसायटी (न्यास) या संस्थेने आपल्या स्व ची ओळख होण्यासाठी व ती मनात ठसविण्यासाठी भरपूर रंगीत चित्रांसहित एक संवादरूपी पुस्तक तयार केले आहे



श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अर्थात आपल्या सर्वांची माऊली. ही माऊली कुठे असते? तर ही माऊली रहायला पुण्याजवळ आळंदी येथे आहे. आळंदी येथे कायमस्वरूपी राहून संपूर्ण जगाची काळजी घेते व जगाला मार्गदर्शन करत असते. काही जण प्रेमाने श्री ज्ञानेधर माऊलींना “ज्ञानोबा” म्हणूनही हाक मारतात.
चला तर मग चित्रपाठ च्या माध्यमातून आपण ज्ञानोबांच्या सहवासात जाऊया.
आपल्या सर्वांना आयुष्यामधे ज्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे त्या सर्व गोष्टींविषयीचे मार्गदर्शन ज्ञानोबा अगदी सहजपणे करतात. ज्ञानोबांचे हेच मार्गदर्शन चित्ररूपातून समजावून घेताना आपल्या सर्वांना एक वेगळाच आनंद मिळणार आहें.
रोजच्या जीवनात उपयोगी पडणारे हे ज्ञान आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. कोणताही भेदभाव न करता ज्ञानोबांनी हे ज्ञान संपूर्ण जगाला उपलब्ध करून दिलेले आहे. आपल्या सर्वांना या ज्ञानाचा उपयोग करून घेऊन
मन-बुद्धीविकास व आत्मविकास साधता येऊ शकतो आणि त्यासाठी कोणत्याही वयोमर्यदेची अट नाही.
आपल्या प्रत्येकाचे व संपूर्ण विश्वाचे कल्याण व्हावे हीच आपल्या ज्ञानोबांची इच्छा आहे. “ज्ञानेश्वरी चित्रपाठ” साकारण्यात सहभागी झालेल्या सर्व माऊलींचे भरपूर कौतुक, आणि अनेक शुभेच्छा.
चला तर मग आपल्या ज्ञानोबांच्या चित्रपाठ शाळेत…
